मा. ना. श्री. शंभूराजे देसाई साहेब पर्यटन, खणीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा वाढदिवस मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे उत्साहपूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण ही करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events


