मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. यांच्या प्रेरणेने दि. 15/10/2025 रोजी इको क्लब व बालसभा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आकाश कंदील तयार करणे, पक्ष्यांसाठी घरटी बनविणे, जुन्या वह्यांतील कोरी पाने एकत्र करून नवीन वही तयार करणे तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्या शिवणे अशी सर्जनशील कामे केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली.मुख्याध्यापकांनी, सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, जबाबदारीची भावना आणि पर्यावरणप्रेमाची जाणीव दृढ होते असे सांगितले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.या उपक्रमामुळे विद्यालयात “हरित शाळा – स्वच्छ शाळा” हा संदेश प्रभावीपणे पसरला.या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्यांचे पर्यटन खनीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालक मंत्री सातारा जिल्हा मा.नामदार श्री शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा , लोकनेते बाळासाहेब देसाई सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा,युवा नेते ॲड.जयराज देसाई दादा,आदित्यराज देसाई दादा , विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी,पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Posted inNews and Events




