मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये थोर शास्त्रज्ञ डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.यावेळी डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन. एस.यांनी केले. श्री. वैभव घोणे सर यांनी डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी तसेच वाचन प्रेरणा दिना विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी महावाचन कार्यक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमास मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पवार व्ही. एन. मॅडम व आभार श्री विकास लोहार सर यांनी मानले.

Posted inNews and Events



