न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात पर्यावरण पूरक आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड कार्यशाळा उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात पर्यावरण पूरक आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड कार्यशाळा उत्साहात संपन्न.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन.एस.सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड करण्याची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.श्री. विकास लोहार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड याचे प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन. एस.सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *