मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयातील 234 विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाॅडेंशन मुंबई चे विशाल देसाई यांच्या सहकार्याने व अहिल्या महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.सुलभा सुर्यवंशी यांच्या प्रयत्नातून स्कूल किट चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन.एस., अहिल्या महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.सुलभा सुर्यवंशी,सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी तसेच धावडे,गोकुळ,कोरडेवाडी,आंबेघर,गुरेघर ,शिद्रुकवाडी,दिक्षी,आंब्रग,बाहे,पाचगणी,काहीर गावचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य, ,सर्व सेवक,आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक श्री. घोणे सर यांनी केले,तर आभार श्री. लोहार सर यांनी मानले.

Posted inNews and Events











