मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयामध्ये मध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन
आज शुक्रवार दि.25 जुलै 2025 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.कुंभार एन.एस.यांच्या संकल्पनेतून इ.5 वी ते इ. 10 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले.परिसरात आढळणाऱ्या सुमारे ५० पेक्षा जास्त रानभाज्या विद्यार्थ्यांनी गोळा करून त्या रानभाज्यांची गुणवैशिष्ट्ये व औषधी गुणधर्म विद्यार्थ्यांनी विषद करून त्यांचे आहारातील महत्त्व सांगितले
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.कुंभार एन. एस. सर, वन्यजीव विभाग हेळवाक चे वनअधिकारी सर्व सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव घोणे सर व आभार श्री विकास लोहार सर यांनी मानले.





