मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात वन्यजीव विभाग हेळवाक व न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी वन्यजीव विभाग हेळवाकचे श्री. भारत खुटाळे ,वनपाल,श्री. सचिन धायगुडे निसर्गसंवादक तज्ञ , श्री कुंडलिक वाळले वनसंरक्षक ,श्री.अमोल सोनवणे,वनसरंरक्षक,श्री.राहुल लोहार ,वनसंरक्षक,श्री. गणेश तनपुरे ,वनसंरक्षक, श्री. हनुमंत काळवेल, वनसंरक्षक उपस्थित होते.या सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्यावतीने स्वागत करण्यात आले.याप्रसंगी वाघ हा अन्नसाखळीमधील किती महत्वाचा घटक आहे .तसेच त्याच्या नैसर्गिक अधिवासाबाबत श्री. सचिन धायगुडे निसर्ग संवाद तज्ञ यांनी प्रोजेक्टरच्या साह्याने विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली. यावेळी वन विभागाच्या वतीने शालेय परिसरात एक पेड माँ के नाम या मोहिमेंतर्गत वृक्षारोपण केले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन. एस.सर ,सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री वैभव घोणे व आभार श्री विकास लोहार यांनी मानले.

Posted inNews and Events








