मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी इ.10वी च्या वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांना पाटावर बसवून आकर्षक रांगोळी काढून चरण पूजन करून श्रीफळ व पुष्प देवून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमांसाठी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन. एस. सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी त्यांनी गुरू परंपरेविषयी माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली.या कार्यक्रमांच्या निमित्ताने कु. आश्लेषा शिंगमोडे कु. पूर्वी शिद्रुक, कु. वैष्णवी सावंत या विद्यार्थीनी मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु प्रज्ञा अवघडे, प्रास्ताविक श्री.वैभव घोणे सर व आभार श्री. विकास लोहार सर यांनी मानले.

Posted inNews and Events







