मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळधावडे विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या व ज्ञानबा तुकाराम च्या जयघोषाने दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या दिंडी सोहळयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करून टाळ, मृदंगाच्या गजरात हरिपाठ आणि अभंग म्हणत हातात भगव्या पताका घेऊन शालेय परिसरात भव्य मिरवणूक काढली. ‘विठ्ठल-विठ्ठल’ या गजरात संपूर्ण शालेय परिसर भक्तिमय झाला होता.या आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या दिंडी सोहळ्यास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Posted inNews and Events







