मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयात 21जून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान -धारणा सादर करत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून उलगडून दाखवले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कुंभार एन. एस. सर यांनी आपल्या मनोगतात योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व सांगितले. यावेळी शारीरिक शिक्षण विषय शिक्षक श्री. घोणे व्ही. ए.,व सौ. पवार व्ही. एन. यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कुंभार एन. एस. सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शिंदे टी. व्ही.यांनी केले,तर आभार श्री.लोहार व्ही. एच.यांनी मानले.

Posted inNews and Events




