मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात आज नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमाला नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी लेझीम पथकाने खेळ सादर केला.या नवागतांच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंभार एन. एस. सर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला.

Posted inNews and Events




