मा.आदित्यराज देसाई दादा यांची न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे  या विद्यालयास सदिच्छा भेट

मा.आदित्यराज देसाई दादा यांची न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयास सदिच्छा भेट

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये सन -2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्याच दिवशी युवा नेते मा.आदित्यराज देसाई दादा यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी मा.आदित्यराज देसाई दादा यांच्या शुभ हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पाठ्यपुस्तके देण्यात आली.या भेटी दरम्यान मा.आदित्यराज देसाई दादा यांनी गत वर्षीच्या विद्यालयाच्या गुणवत्तेबाबत प्रशंसा केली.तसेच प्रत्येक वर्गात जाऊन शालेय कामकाजाची, प्रयोगशाळेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयातील सर्व सेवकांना तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कुंभार एन. एस. सर , सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *