मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात एस.एस.सी.सन 2009-10 या बॅचचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीस विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.कुंभार एन.एस.सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. विद्यालयाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थी यांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांचे पुष्प व पेन देऊन स्वागत केले. शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सन 2009-10 या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही देण्यात आला. त्याचा स्वीकार विद्यालयाचे वतीने मुख्याध्यापक मा श्री.कुंभार एन.एस.व सर्व शिक्षक यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.शेजवळ एस.डी. यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी यांच्या वतीने श्री धनाजी सुर्वे व श्री महेश वरंडे यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाविषयी आपलं प्रेम,कृतज्ञता व शिक्षकाविषयी आदर व्यक्त केला. मा.श्री.शिंदे टी.व्ही., मा. श्री.मोरे आर.आर. यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. कुंभार एन.एस.यांनी शाळेच्या प्रगती विषयी माहिती दिली तसेच भविष्यात असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मा.श्री. लोहार व्ही. एच. यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी सौ.घाडगे- कडव मॅडम.,सौ.यादव मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आभार मा.श्री.घोणे व्ही.ए. यांनी मानले. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेविषयी प्रेम आणि आनंद दिसून येत होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Posted inNews and Events



