मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वतीचे पूजन श्री.विजय शिद्रुक, श्री किसन बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण गोकुळ तर्फ पाटण च्या सरपंच सौ.नीता राजाराम गालवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत ध्वजगीत,राज्य गीत व लेझीम पथक सादर करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री कुंभार एन एस.यांनी केले.तसेच यावेळी इ. 5 ते इ. 9 वी या वर्गांचे वार्षिक परीक्षा निकाल जाहीर करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सौ.सविता संतोष सुतार ,सौ अरुणा संभाजी मोरे,श्री विष्णू शिंगमोडे, श्री. अमर ढोपरे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीव विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events





