लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या गौरव यात्रेमध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयाच्या आकर्षक चित्ररथ व लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल कारखाना कार्यस्थळावर मा.ना. श्री. शंभूराज देसाई साहेब, पर्यटन,खनि कर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा, मा.श्री.रविराज देसाई (दादा) अध्यक्ष,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी,मा. श्री. यशराज देसाई (दादा)चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलत नगर, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक,सर्व संचालक मंडळ तसेच सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले. उत्कृष्ट चित्ररथ तयार केल्याबद्दल श्री.शेजवळ सर व सहकारी, उत्कृष्ट लेझीम पथक सादर केल्याबद्दल श्री.लोहार सर, सौ. पवार मॅडम व सहकारी, लेझीम पथक सादर करणाऱ्या मुलींसाठी टोप्या उपलब्ध करून देणारे श्री.कांबळे सर तसेच लेझीम पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल सहभागी विद्यार्थिनींचे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन.एस.सर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events









