महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. शंभूराज देसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयात महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद सातारा यांचे संयुक्त विद्यमाने कोयना डोंगरी महोत्सव-2025अंतर्गत विद्यालयातील 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना HPVप्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी पुण्याहून आलेल्या आरोग्य पथकातील श्री. दिपेश कदम सर,श्री कृणाल मेहता सर, श्री. सुभाष अंगर सर,व डॉ.सिमरन यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री कुंभार एन.एस. सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Posted inNews and Events






