न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयात लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयात लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचालित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन एस. सर यांनी लोकनेते साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी लोकनेत्यांच्या जीवनाविषयी मनोगते व्यक्त केली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने मा. मुख्याध्यापक श्री. कुंभार एन. एस सर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक व शालोपयोगी साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर व आभार श्री.लोहार सर यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *