मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ -धावडे विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास सुरुवातीस श्रेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुंभार एन. एस. सर यांनी मराठी भाषा कशी समृद्ध आहे याविषयी माहिती सांगितली. तसेच श्री शेजवळ सर, श्री. शिंदे सर, श्री. लोहार सर, श्री. घोणे सर यांनी मराठी भाषेविषयी आपले विचार व्यक्त केले. मराठी विषय शिक्षिका सौ पवार मॅडम यांनी कवी कुसुमाग्रजांचा जीवनपट सांगितला.तसेच विद्यार्थिनींनी कविता गायन केले. यावेळी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे आभार श्री मोरे सर यांनी मानले.कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events







