मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.
शिवजयंती निमित्त विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन. एस. सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर जय शिवाजी,जय भारत पदयात्रा गोकुळ गांव ते न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे अशी काढण्यात आली. या पदयात्रेत गोकुळ गावच्या सरपंच सौ.नीता गालवे , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुंभार एन. एस.सर , सर्व शिक्षक व विद्यार्थी,ग्रामस्थ, पालक,माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या लेझीम पथकाने लेझीम नृत्य सादर केले.या लेझीम पथकाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय या उदघोषाने शालेय परिसर दुमदुमून गेला. या पदयात्रेत सहभागी विद्यार्थ्यांना गोकुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री.किसन गालवे यांनी खाऊ वाटप केले.

Posted inNews and Events










