न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयात एस.एस.सी.विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयात एस.एस.सी.विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात एस.एस.सी विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे उपाध्यक्ष मा.श्री.विलास कुराडे साहेब, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा.श्री. सूर्यकांत कोळेकर,जिल्हा परिषद सातारा चे माजी सदस्य मा.श्री.बशीरभाई खोंदू व अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन.एस.सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेजवळ एस.डी.सर यांनी केले. यावेळी विद्यालयाच्या सन- 2024 च्या इ.10 वी तील प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध उपक्रमातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे उपाध्यक्ष मा.श्री.विलास कुराडे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व माजी मुख्याध्यापक मा.श्री.सूर्यकांत कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन. एस.सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास कराओके साऊंड सिस्टिम भेट म्हणून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोणे सर व आभार श्री.शिंदे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी धावडे गावचे मा.श्री.बळीराम सुर्वे, मा.श्री शिवाजी शेंडे, मा.श्री.राजेंद्र कुराडे, तसेच पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *