मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबर त्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान अवगत होण्यासाठी विद्यालयामध्ये बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते, यामुळे शालेय परिसर अवघा गजबजून गेला होता. या बाल बाजारामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बाल बाजारामध्ये भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.या बाल बाजारास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन.एस.सर,सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी भेट देऊन भाजीपाला व खाद्यपदार्थ खरेदी केले.

Posted inNews and Events





