76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शालेय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यालयाच्या परिसरातील गोकुळ, शिद्रुकवाडी धावडे व कोरडेवाडी या गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित प्राथमिक शाळा गोकुळ च्या मुख्याध्यापिका सौ.शिर्के मॅडम, शिक्षक श्री. संदेश ध्यावर्तीवार सर, प्राथमिक शाळा कोरडेवाडी चे मुख्याध्यापक श्री. महेंद्र जाधव सर, शिक्षक श्री. आनंदा जाधव सर, प्राथमिक शाळा धावडे च्या शिक्षिका सौ. संकपाळ मॅडम, प्राथमिक शाळा शिद्रुकवाडीचे मुख्याध्यापक श्री.शंकर यादव सर प्राथमिक शाळा गुरेघर चे मुख्याध्यापक श्री.उगले सर तसेच प्राथमिक शाळा आंबुळेचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण गायकवाड सर यांचे व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन. एस.सर विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events













