न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.सौ.पवार मॅडम यांनी प्रास्तविक केले. इ.9वी च्या विद्यार्थीनींनी लेक वाचवा हो वाचवा हे गीत सुंदर पद्धतीने सादर करण्यात आले.तसेच इ.7वीतील विद्यार्थिनींनी माय सावित्री तू महान हे गीत सादर केले.यावेळी अनेक मुलींनी मनोगते व्यक्त केली व कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. कुंभार एन. एस. सर यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी पारंपारिक वेशभुषेत उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक यांनी भाषण,कवितागायन ,वेशभुषा करणार्या मुला-मुलींचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील मराठी विषय शिक्षिका सौ.पवार मॅडम यांनी केले होते. कार्यक्रमाचे आभार मा.श्री. शेजवळ सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events














