रोटरी क्लब ऑफ मुंबई (साऊथ) यांचे वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक हा नेशन बिल्डर पुरस्कार नुकताच मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात आपल्या मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयातील विद्यार्थी प्रिय गणित शिक्षक श्री शिंदे टी. व्ही. यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यानिमित्त पुरस्कार प्राप्त श्री शिंदे टी. व्ही यांचे ना. मा. श्री. शंभूराज देसाई साहेब, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री सातारा व ठाणे जिल्हा, मा. श्री. रविराज देसाई (दादा) अध्यक्ष,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी मा. श्री. यशराज देसाई (दादा ) चेअरमन, लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखाना दौलतनगर, युवा नेते मा. श्री. जयराज देसाई (दादा ), युवा नेते मा. श्री. आदित्यराज देसाई (दादा ), संस्थेचे संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले

Posted inNews and Events


