न्यू इंग्लिश स्कूल धावडे विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा सह्याद्री व्याघ्र राखीव वनपरिक्षेत्र हेळवाक यांच्यावतीने 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने श्री भारत खुटाळे वनपाल आटोली, श्री तानाजी शिंदे वनपाल कोळणे, श्री रमेश वालकोळी वनपाल हेळवाक, श्री.हणमंत काळवेल वनरक्षक श्री. आप्पासाहेब नरुटे वनरक्षक श्री रमेश जाधव वनरक्षक, श्री गणेश शेंडे वनरक्षक, श्री कुंडलिक वाळले वनरक्षक, श्री गणेश तनपुरे वनरक्षक, श्री आकाश ठेंभरे वनरक्षक, श्री विकास सपकाळ वन रक्षक या मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन. एस.व व विद्यालयातील शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री कुंभार एन एस. यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वन्यजीवाविषयी प्रश्न विचारले. उपस्थित अधिकाऱ्यांनी वन्य जीव सप्ताह विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटांमध्ये प्रथम तीन नंबर प्राप्त विद्यार्थ्यांना सह्याद्री व्याघ्र राखीव वनपरिक्षेत्र हेळवाक यांचे वतीने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच विद्यालयाने सहभाग घेतल्याबद्दल विद्यालयास सन्मानचिन्ह देण्यात आले. त्याचा स्वीकार विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी केला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








