पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयात या आज 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण धावडे गावचे सरपंच मा.श्री. दत्तात्रय अवघडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सरस्वतीचे पुजन मा. श्री.शामराव पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हस्तकलेच्या प्रदर्शनाचे उदघाट्न मा. श्री. बळीराम सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमांसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन.एस., सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी तसेच धावडे,गोकुळ,कोरडेवाडी,आंबेघर गुरेघर , शिद्रुकवाडी, दिक्षी,आंब्रग,बाहे,पाचगणी,काहीर गावचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य, ,सर्व सेवक,आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक श्री. घोणे सर यांनी केले,तर आभार श्री. शिंदे सर यांनी मानले.

Posted inNews and Events










