मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वनविभागाचे श्री.भारत खुटाळे, वनपाल,श्री.शिवशंकर दापके,वनसंरक्षक,श्री.अमोल सोनवणे,वनसरंरक्षक,श्री.रमेश जाधववर,वनसंरक्षक,श्री.मनोज पवार,वनसंरक्षक उपस्थित होते.या सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्यावतीने स्वागत करण्यात आले.याप्रसंगी श्री.मनोज पवार ,श्री.अमोल सोनवणे व श्री.भारत खुटाळे यांनी वाघ या प्राण्याविषयी माहिती दिली.वाघ हा अन्नसाखळीमधील किती महत्वाचा घटक आहे .तसेच त्याच्या नैसर्गिक अधिवासाबाबत श्री.मनोज पवार यांनी माहिती दिली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.नथुराम कुंभार सर ,सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events







