पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक श्री.एन.एस कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त बालचमुंची वारी शिक्षणाची…प्रगत महाराष्ट्राची संकल्पना घेवून शालेय दिंडी काढण्यात आली .सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थित बाल दिंडीचे आयोजन उत्स्फूर्तपणे करण्यात आले होते. दिंडीचा प्रारंभ विद्यालयात माऊलीच्या मुर्ती पुजनाने व हरिपाठाने झाला. त्यांनतर दिंडी धावडे गावात गेल्यानंतर तिथे ग्रामपंचायत ,ग्रामस्थ व महिलांनी दिंडीचे पुजन केले.यडोबा मंदिराच्या मैदानात गोल उभे रिंगण झाले.शालेय व गावचा परिसर विठू नामाच्या निनादाने व टाळ मृदंगाच्या आवाजाने दुमदुमून गेला होता.या शालेय दिंडी मध्ये टाळ, मृदुंग, विना, मुलांच्या रूपातील विठ्ठल -रुक्मिणी, डोक्यावर तुळस व हातामध्ये भगवी पताका,घेवून विद्यार्थी वारकरी पोशाखात आले होते.अशाप्रकारे विद्यालयात बालदिंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Posted inNews and Events











