पाटण – विद्यार्थ्याना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षकानी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी स्पर्धा परीक्षा आयोजन व मार्गदर्शन, शालेय – सहशालेय उपक्रम, असे विविधांगी उपक्रम शालेय स्तरावर राबविणे आवश्यक आहे, असे मत यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांनी व्यक्त केले, तसेच स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष होतोय यांचा मला सार्थ अभिमान वाटतो असेही ते यावेळी म्हणाले,आज ते न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे या विद्यालयाच्या नूतन मुख्याध्यापक पदी नियुक्त झालेल्या श्री.एन.एस.कुंभार सर यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते,यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री.यशराज देसाई दादा यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी श्री.एन.एस.कुंभार सर यांचा शाल, श्रीफळ,व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे वतीने शुभेच्छा दिल्या, या सत्कार समारंभ प्रसंगी शिवाजीराव देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल. केंडे सर प्राचार्य डॉ.श्री.एस.एम.शिंदे, प्राचार्य श्री.जी. आर.सत्रे,प्राचार्य श्री.ए. टी.शिंदे, मुख्याध्यापिका सौ.वाय.डी.संकपाळ, तसेच मोरणा शिक्षण संस्था परिवार व बाळासाहेब देसाई फौंडेशन मधील सर्व सेवक उपस्थित होते.

Posted inNews and Events









![स्व.शिवाजीराव देसाई[आबासाहेब] यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन](https://mornashikshansanstha.org/NESDhawade/wp-content/uploads/2024/07/IMG-20240712-WA00551-150x150.jpg)