शनिवार दिनांक 01-06- 2024 रोजी मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळधावडे विद्यालयात नवीन इमारत व नवीन बांधकामाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.या महापूजा निमित्त संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. रविराज देसाई [दादा ] व संस्थेचे सचिव माननीय श्री.डी.एम.शेजवळ दादा यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब दक्षिण मुंबई चे सदस्य व माजी मुख्याध्यापक मा.श्री.नवनाथ पानस्कर सर ,शिवाजीराव देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री केंडे सर न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मदने सर तसेच बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव माननीय श्री कुंभार सर आदींची उपस्थिती होती. तसेच न्यू इंग्लिश स्कूल गोकुळधावडे विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक श्री शेजवळ सर शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तसेच धावडे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बळीराम सुर्वे,,श्री शिवाजी शेंडे, श्री शंकर वरंडे,श्री संदीप कोळेकर, पालक,माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.






