मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये शनिवार दि.15/06/2024 रोजी शै.वर्ष 2024-2025 या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा आजचा पहिला दिवस या निमित्ताने विद्यालयाच्या वतीने नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे..एस. सर यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प , वही, पेन, देवून सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव मा.श्री.नथुराम कुंभार सर यांनी केले, तर आभार मा.श्री.शेजवळ एस.डी.सर यांनी मानले.या नवगतांच्या स्वागत प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Posted inNews and Events





