पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.मदने हे नियत वयोमानानुसार 30 जून रोजी सेवा निवृत्त होत आहेत ,त्या निमित्त त्यांचा आज विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला, यावेळी ते म्हणाले की,मोरणा शिक्षण संस्थेमध्ये मी 1994 साली सोनवडे या माध्यमिक विद्यालयांमध्ये सुरुवातीला लागलो, 29 वर्षे मी त्या ठिकाणी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले, संस्थेशी प्रमाणिक राहून अध्यापनाचे कार्य करीत असताना मला लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे मार्गदर्शक मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब, मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा यांच्यामुळे मला संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून मला काम करण्याची संधी दिली, याबद्दल खरोखरच मी देसाई घराण्याचा कायम ऋणी राहीन आशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या , या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री.एन.एस.कुंभार सर, यांनी प्रास्ताविक केले, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल. केंडे सर , श्री.ए.के.जाधव, श्री.एस.डी.शेजवळ यांनी मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रम वेळी प्राचार्य डॉ.श्री.एस.एम.शिंदे, प्राचार्य श्री जी.आर.सत्रे, प्राचार्य श्री. व्ही.एन.कांबळे, त्याचप्रमाणे, मोरणा विभागातील विविध गावचे सरपंच, उपसंरपच, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मोरणा शिक्षण संस्थेतील सेवक वर्ग व सर्व आजी माजी विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार श्री.वैभव घोणे सर यांनी मानले

Posted inNews and Events





