मा.ना. श्री. शंभुराज देसाई साहेब, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे विशेष प्रयत्नातून आज अखेर विद्यालयास एकूण 97,27,383/- रुपये एवढा भरघोस निधी

मा.ना. श्री. शंभुराज देसाई साहेब, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे विशेष प्रयत्नातून आज अखेर विद्यालयास एकूण 97,27,383/- रुपये एवढा भरघोस निधी

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे ता. पाटण या माध्यमिक विद्यालयास मा.ना. श्री. शंभुराज देसाई साहेब, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे विशेष प्रयत्नातून विद्यालयास सन 2017-2018 मध्ये कोयना भूकंप निधीतून 15,00,000/- पंधरा लाख रुपये निधी विद्यालयास सभागृह व दोन वर्ग खोल्या बांधण्यासाठी  मिळाला. सन 2019-2020 मध्ये जिल्हा क्रीडा विभाग सातारा यांचेकडून विद्यालयाचे क्रीडांगण समपातळीकरणासाठी 7,00,000/- सात लाख रुपये एवढा निधी मिळाला. त्याचप्रमाणे सन 2020-2021 मध्ये जिल्हा क्रीडा विभाग सातारा यांचेकडून व्यायामशाळा बांधकामासाठी 7,00,000/- सात लाख रुपये एवढा निधी मिळाला. तसेच सन 2023-2024 मध्ये कोयना भूकंप निधीमधून विद्यालयाचे जुनी इमारत दुरुस्तीसाठी 35,00,000/- पस्तीस लाख रुपये एवढा निधी मिळाला. त्याचप्रमाणे सन 2023-2024 मध्ये C.S.R. फंडातून जलशुद्धीकरण प्रकल्प, हँडवॉश स्टेशन, मोरणा नदीपासून शाळेपर्यंत पाईपलाईन व पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृह या सुविधांसाठी 33,27,383/- एवढा निधी मिळाला. आज अखेर विद्यालयास एकूण 97,27,383/- रुपये एवढा भरघोस निधी मिळाला आहे.या सर्व सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई दादा यांनी दिली.