पाटण -मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये मुख्याध्यापक तसेच इंग्रजी विषयांचे उपक्रमशील शिक्षक श्री.जगदीश मदने सर यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून यावर्षीचा रोटरी क्लब आॅफ मुंबई (दक्षिण)यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर अॅवार्ड 2023 हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,त्याबरोबर न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचे उपक्रमशील वरीष्ठ शिक्षक श्री.शरद शेजवळ सर यांनाही रोटरी क्लब आॅफ मुंबई (दक्षिण)यांचे वतीने नेशन बिल्डर अॅवार्ड 2023 हा गुणवंत अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी रोटरी क्लब मुंबई (द) चे रोटरीयन अरूण भार्गव,शिवप्रसाद खातूर,नर्गिस गौर,नवनाथ पानस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्यन हायस्कूल गिरगांव मुंबई येथील सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला.या पुरस्काबद्दल मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब,उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री (सातारा व ठाणे जिल्हा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा),लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते मा.श्री.यशराज देसाई (दादा),युवा नेते जयराज देसाई (दादा),आदित्यराज देसाई(दादा) ,मोरणा शिक्षण संस्थेंचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ(दादा),बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.सर , तसेच मोरणा शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक,प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी पुरस्कारप्राप्त अध्यापकांचे मनपूर्वक अभिनंदन केले.

Posted inNews and Events



![न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयास मोरणा प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई [दादा] यांची भेट.](https://mornashikshansanstha.org/NESDhawade/wp-content/uploads/2024/05/Adhyaksh-Bhet-1-150x150.jpeg)