लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 114 वी जयंती उत्साहात साजरी

लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 114 वी जयंती उत्साहात साजरी

 न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 114 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी लोकनेत्यांच्या जीवनाविषयी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस. यांनी लोकनेते साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री.कुंभार एन.एस.,श्री.शेजवळ एस.डी व सर्व शिक्षक , शिक्षकेतर  कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर व आभार श्री.शिंदे सर  यांनी मानले.