मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ/धावडे विद्यालयात 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, तसेच क्रांतीसुर्य नाना पाटील यांचा स्मृतिदिन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक श्री. घोणे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मदने सर होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. डॉ. आंबेडकरांचा जीवनपट शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री शेजवळ सर यांनी सांगितला. मुख्याध्यापक तसेच लो.बा.डे.फौंडेशनचे सचिव श्री. कुंभार सर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नाना पाटील यांचे जीवन कार्य सांगितले. तसेच इयत्ता सहावी, सातवी, व नववीच्या विद्यार्थिनींनी आंबेडकरांचा जीवनावर कविता ,भाषण व घोषवाक्ये सादर केले.कार्यक्रमाचे आभार श्री.लोहार सर यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.






