पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात 77वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण धावडे गावचे सरपंच मा.श्री. दत्तात्रय अवघडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सरस्वतीचे पुजन गोकुळचे मा.श्री.शंकर सुर्वे व धावडेचे मा.श्री.लक्ष्मण यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल., लोकनेते बाळासाहेब देसाई दौलत फाऊंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी,सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी तसेच धावडे,गोकुळ, कोरडेवाडी,आंबेघर ,गुरेघर, शिद्रुकवाडी, दिक्षी,आंब्रग,बाहे,पाचगणी,काहीर या विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य, ,सर्व सेवक,आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर यांनी केले,तर आभार श्री.शिंदे सर यांनी मानले.

Posted inNews and Events









