न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज इ.5वी ते इ.10 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत कमान उभारुन ,ढोल ताशा व झांजाच्या गजरात व फुलांची उधळण करत तसेच वही ,पेन व पुष्प  देवून करण्यात आले.यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी धावडे गावचे सरपंच श्री.दत्तात्रय अवघडे ,उपसरपंच श्री.विजय शिद्रुक,गोकुळचे उपसरपंच श्री.संजय असवले, दिक्षीचे श्री.किसन बोत्रे ,श्री.रामचंद्र साळुंखे, आंब्रगचे श्री.संजय पवार ,श्री.विलास पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.,वरिष्ट शिक्षक मा..श्री.शेजवळ एस.डी.सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विदयार्थी उपस्थित होते.