मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संस्थेच्या न्यू इंग्लिश गोकुळ -धावडे या माध्यमिक विद्यालयात 1 मे चा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम धावडे गावचे सरपंच मा. श्री दत्तात्रय अवघडे यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमावेळी इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशीप परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मा.सरपंच व मुख्याध्यापकांच्या हस्ते संपन्न झाला तसेच याच दिवशी तंबाखू मुक्तीची शपथ शिक्षक व विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. केंडे पी.एल.सर,लो.बा.दे फौ.चे सचिव मा.कुंभारएन.एस.सर वरिष्ठ शिक्षक मा.शेजवळ एस.डी. सर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events






