लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 40 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 40 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 40 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली..यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी लोकनेत्यांच्या जीवनाविषयी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री पी एल केंडे यांनी लोकनेते साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेतर  कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर व आभार श्री.मोरे सर यांनी मानले.