मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ -धावडे विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्री घोणे सर यांनी केले.लो. बा. दे. फाउंडेशन चे सचिव श्री कुंभार सर यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली. वरिष्ठ शिक्षक श्री शेजवळ सर यांनी सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी विषय शिक्षिका सौ पवार मॅडम यांनी कवी कुसुमाग्रजांचा जीवनपट सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक केंडे सर होते.कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

Posted inNews and Events





