न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई [दादा] यांच्या संकल्पनेतून श्री. हर्ष शुक्ला सर (मॅनेजिंग डायरेक्टर पुणे) यांनी बी.आय.एस.क्लबची स्थापना केली. यावेळी श्री. हर्ष शुक्ला सर यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल. यांनी केले .यावेळी श्री. हर्ष शुक्ला सर यांनी आपल्या मनोगतात आज व्यवहारात किराणा माल,इलेक्टीकल वस्तु ते सोन्यापर्यंत वस्तु घेताना ग्राहकांची फसवणुक होते.ही फसवणुक होऊ नये व त्या वस्तु प्रमाणित आहेत की नाही हे कसे ओळखायचे .हे ज्ञान विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी पोहचविण्यासाठी बी.आय.एस.ही केंद्रसरकारची संस्था कार्य करते.ही संस्था विविध वस्तुंचे मानांकन(प्रमाणित) करणारी संस्था आहे असे सांगितले.यावेळी ध्वनीचित्रफीत,तक्त्यांद्वारे माहीती देण्यात आली.
यावेळी वरिष्ठ शिक्षक श्री. शेजवळ एस.डी. ,लो.बा.दे.फौंंडेशनचे श्री.कुंभार एन.एस. ,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार श्री.घोणे सर यांनी मानले.







