राष्ट्रीय मतदार दिवस

राष्ट्रीय मतदार दिवस

२५ जानेवारी २०२३रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या जनजागृती रॅलीचा शुभारंभ विद्यालयाचे  वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर यांचे हस्ते करण्यात आला.या रॅलीमध्ये मुख्याध्यापक श्री.केंडे सर , श्री.कुंभार सर ,(सचिव,लो.बा.दे.फौंडेशन दौलतनगर),सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.ही रॅली विद्यालय ते धावडे यडोबा मंदिर व परत विद्यालय अशी काढण्यात आली.या रॅलीमध्ये मतदान जागृतीविषयी विद्यार्थ्यांच्याकडुन विविध घोषणा देण्यात आल्या.