राष्ट्रीय बालिका दिवस

राष्ट्रीय बालिका दिवस

बेटी पढाओ बेटी बचाओ योजनेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या जनजागृती रॅलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर ,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर श्री.कुंभार सर ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.ही रॅली विद्यालय ते धावडे यडोबा मंदिर व परत विद्यालय अशी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या रांगोळी प्रदर्शनाचे उद्धाटन लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर ,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.