न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून उत्साहात साजरा.
मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल. सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री.शेजवळ एस.डी. सर,श्री.कुंभार एन.एस सर ,मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल. सर तसेच विदयार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत व आभार गणित शिक्षक श्री.शिंदे टी.व्ही सर यांनी मानले.या कार्याक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी आकर्षक गणितमधील आकृत्या रांगोळीच्या सहाय्याने साकारल्या व विद्यार्थीनींनी गणितावरील कविता ,उखाणे,गणितावरील बातम्या व लग्नपत्रिका सादर केल्या.या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ,व सर्व विदयार्थी उपस्थित होते.









