सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग व सातारा जिल्हा क्रीडा विभाग सातारा यांचे संयुक्त विदयमाने पाटण तालुका शासकीय शालेय खो-खोस्पर्धा दि:30 नोंव्हेबर व दि :1 डिसेंबर या कालावधीत मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये संपन्न झाल्या
या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.डी.एम.शेजवळ यांच्या शुभ हस्ते करणेत आले.याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव व माजी पंचायत समिती सदस्य श्री.एन.एस.कुंभार सर,विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल.सर, महाराष्ट्र राज्य क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर यादव सर,पाटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री.आर.डी.देसाई सर,उपाध्यक्ष श्री.शिरीष पाटील सर,सचिव श्री.रमेश लोंढे सर,तालुका समन्वयक प्रा.श्री.दिनेश रेवडे सर,तसेच महाराष्ट्र क्रीडा असोशिएशन,व जिल्हा क्रीडा असोशिएशनचे पदाधिकारी तसेच सर्व क्रीडा शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.हीस्पर्धा पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातील 14 वर्षाखालील व 19 वर्षाखालील पात्र मुले-मुली यांचे खो-खोच्या संघात खेळवण्यात आली..ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या विदयालयाचे क्रीडा शिक्षक व आयोजक श्री.घोणे सर श्री.शेजवळ सर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.






