शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022- 23या दिवशी आमच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ -धावडे या विद्यालयात हात धुवा दिन संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. केंडे सर यांनी केले. तर वैयक्तिक स्वच्छतेतील एक घटक म्हणून जेवणापूर्वी व शौचानंतर हात धुण्याचे फायदे व महत्त्व श्री. शेजवळ सर यांनी सांगितले. हात धुण्याचे प्रात्यक्षिक मा. कुंभार सर यांनी दाखवले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आभाराचा कार्यक्रम सौ. पवार मॅडम यांनी घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Posted inNews and Events



