मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे या विद्यालयामध्ये माजी खासदार शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या 108 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी एस.एस.सी. मार्च 2022 परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व रोखरक्कम मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई फाऊंडेशनचे सचिव मा. श्री. एन. एस. कुंभार सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. एल. केंडे सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. डी. शेजवळ सर यांनी केले, व आभार श्री. व्ही. ए. घोणे सर यांनी मानले.

