संस्थेचे सचिव माननीय श्री डी एम शेजवळ दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा संपन्न झाली.

संस्थेचे सचिव माननीय श्री डी एम शेजवळ दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा संपन्न झाली.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयामध्ये आज संस्थेचे सचिव माननीय श्री डी एम शेजवळ दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा संपन्न झाली. सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. विद्यालयात गुणवत्ता वाढ होण्यासाठी  माननीय दादांनी सखोल मार्गदर्शन केले. आयटीआय प्रवेश वाढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकामध्ये माननीय कुंभार सर यांनी विद्यालयामधील कामकाजाचा आणि प्रगतीचा आढावा सादर केला. मुख्याध्यापक केंडे सर यांनी  शाल, श्रीफळ आणि पेढे देऊन माननीय दादांचा सत्कार केला. विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक शेजवळ सर यांनी आभार मानले. या सह विचार सभेला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.