पाटण तालुक्यातील दुर्गम गावागावात शिक्षणाची गंगा पोहचावी यासाठी ९ जुलै १९८२ रोजी स्व .शिवाजीराव दौलतराव देसाई यांनी “ मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी” या शिक्षण संस्थेची स्थापना केली .

आज या संस्थेची ३ माध्यमिक शाळा १ इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अशा पाच शाखा आहेत .

संस्थेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार शंभुराज देसाई (साहेब ) यांच्या व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा .रविराज देसाई (दादा )यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिक्षण संस्था प्रगतीपथावर अग्रेसर आहे .

पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेमुळे रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष ,संचालक हे नेहमी आग्रही असतात .